पिंपरी चिंचवड महापालिका आशा स्वयंसेवक पदाच्या ३६० जागांसाठी भरती
दिपक साबळे..!
पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत आशा स्वयंसेवक पदाच्या ३६० रिक्त जागा भरण्यासाठी महापालिकेने अर्ज मागवले आहेत. अर्ज हे आॅफलाईन असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख 2 जून 2020 असणार आहे.यासाठी कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही.
पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आशा स्वयंसेविका पदे भरणेबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉपोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ एण्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी अंतर्गत अभियान ( NHM ) या कार्यक्रमासाठी आशा स्वयंसेविका ( ASHA ) या पदाची पदे आकुर्डी रुग्णालय, यमुनानगर रुग्णालय वाय.सी.एम रुग्णालय, सांगवी रुग्णालय, संभाजीनगर, जिजामाता रुग्णालय, तालेरा रूग्णालय, थेरगांव रूग्णालय या रूग्णालयातील झोनमध्ये येणाऱ्या दवाखान्यात आशा स्वयंसेविका भर्ती होणार आहे.
आशा स्वयंसेविका या पदाची शैक्षणिक अर्हता व वय खालील प्रमाणे आहे .
शैक्षणिक अर्हता :- किमान ८ ( आठवी ) उत्तीर्ण , विवाहित महिला , शासकिय सेवेत लिंक वर्कर , महापालिकेच्या विविध | आरोग्य कार्यक्रमांमध्ये कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य . तसेच स्थानिक , आदिवासी , विधवा , परितक्त्या महिलांना य स्वयंसेवी संस्थेची कार्यकर्ती यांना प्राधन्य . ( अनुभवाचे बाबतीत अनुभवाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक ) वय किमान २५ ते कमाल ४५ वर्षे अटी व शर्ती आरोग्य अभियानांतर्गत भरण्यात येणा – या वरील निवड थेट मुलाखतीने करण्यात येईल. या पदांचा पिंपरी चिंचवड म.न.पा.आस्थापनेशी कसलाही संबंध नाही.
कागदपत्रे १. इच्छुक व पात्र उमेदवारांनी म.न.पा.वेबसाईट www.pcmcindia.gov.in वर दिलेल्या नमुन्यातील अर्ज व त्यासोबत शैक्षणीक अर्हता प्रमाणपत्रे व खालील कागदपत्रांच्या छायांकित सत्यप्रती जोडाव्यात . ( अर्जासोबत मुळ कागदपत्रे जोडू नयेत . ) २. पासपोर्ट साईज फोटो ३. जन्म दाखलेचा पुरावा ( जन्माचा दाखला / शाळा सोडल्याचा दाखला ) ४. रहिवाशी दाखला किंवा आधारकार्ड , मतदान ओळखपत्र , रेशनिंगकार्ड ५. अनुभव प्रमाणपत्र