पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक “मोबाईल टॅब” चे वाटप करावे – प्रदिप म्हस्के
पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळातील इयत्ता 1 ली ते 9 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता शैक्षणिक “मोबाईल टॅब” चे वाटप करण्या संदर्भात आयुक्त श्रावण हर्डीकर यांना सामाजिक कार्यकर्ते प्रदिप म्हस्के याबाबत निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष 2019-20 चे नुकसान झाले असुन पहिली ते नववी पर्यंतच्या च्या विद्यार्थ्यांना थेट पुढील वर्गात प्रवेश देखील देण्यात येणार असल्याचे राज्य शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे..आत्ता जास्त काळ विद्यार्थ्यांना शाळांपासून दूर ठेवणे हिताचे नाही या अनुषंगाने राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने यंदाचे शैक्षणिक वर्ष 2020-21 हे 15 जुन पासुन सुरू करण्याचा मानस बोलुन दाखवला आहे व शिक्षण विभागाच्या प्रत्येक विभागाने “एज्युमित्रा” अँप डाउनलोड देखील केले असल्याची माहिती मिळाली. या मागे शालेय कामकाजाचे 210 दिवस भरले जाणे आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान न होण्याचा दृष्टीकोन दिसतो.
याचं धर्तीवर पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये तर 15 जुन पासुन ऑनलाईन वर्ग भरणार असल्याचे कळाले हे वर्ग शाळेच्या वेळेमध्ये भरवण्यात येणार असुन शिक्षकांना तशा सुचना व ट्रेनिंग देखील दिली असल्याची माहिती मिळाली..
पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना संसर्गाची वाढती आकडेवारी लक्षात घेता पिंपरी चिंचवड शहरात देखील असे ऑनलाईन वर्ग भरवण्यात यावेत व शालेय विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान कमी करण्यासंदर्भात आपण योग्य ती भुमिका घ्यावी अशी विनंती
तसेच,पुणे महानगरपालिकेच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड शहरातील महानगरपालिका शाळांमध्ये देखील 15 जुन पासुन हे ऑनलाईन वर्ग भरवण्यात येऊन प्रत्येक विद्यार्थ्याला यात सहभागी होण्याच्या दृष्टीने शैक्षणिक “मोबाइल टॅब’ चे वाटप करण्यात यावे जेणेकरुन महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणारा कुठलाही सर्वसामान्य विद्यार्थी या ऑनलाईन शिक्षणापासून वंचित रहाणार नाही.
आपण या दृष्टीने लवकरात लवकर सकारात्मक कारवाई करून विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा असेही त्यांनी पञात म्हटलं आहे