दिवंगत दत्ताकाका सानेच्या कार्यालय हल्ला व मृत्यूची चौकशी करा : पार्थ पवार यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी
पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नगरसेवक दत्ताकाका साने यांचे काही दिवसांपूर्वी कोरोनामूळे आणि ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या चिखली येथील निवासस्थानी आज राष्ट्रवादीचे नेते पार्थ अजित पवार यांनी भेट देऊन साने कुटुंबीयांचे सांत्वन केले.
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक मयूर कलाटे हे उपस्थित होते. यावेळी साने कुटुंबीयांना काकांच्या मृत्यू हा घातपात असल्याची शक्यता वर्तवली. कोरोना होण्यापूर्वी त्यांनी पोलीस आयुक्त यांना कार्यालयावर झालेल्या हल्ल्यामधील पुरावे आहेत असे सांगितले होते. त्यानंतर ते कोरोना झाल्याने आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यात त्याचा मृत्यू झाला आहे त्यामुळे मृत्यूची सखोल चौकशी करण्याची ही मागणी पार्थ पवार यांच्याकडे साने कुटुंबियानी केली.
यावर तातडीने पार्थ पवार यांनी पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्त संदीप विष्नोई यांची भेट घेतली. यावेळी स्व. दत्ता साने यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याबाबत तपासात कोणकोणत्या कारवाई करण्यात आल्या याची माहिती त्यांनी घेतली. तसेच साने कुटुंबियाकडून वारंवार होणार्या घातपाताच्या शंका या घटनांचा संदर्भ देत दोन्ही घटना घटनांची चौकशी व तपास सखोलपणे करावा अशा सूचना पार्थ पवार यांनी पोलिस आयुक्तांना यावेळी दिल्या.