क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

सांगवीत भरधाव वेगाने येणाऱ्या कारने धडक दिल्याने महिलेचा मृत्यू

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी परिसरातील रक्षक सोसायटी चौकाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील चालक महिलेचा मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेल्या एकाला गंभीर दुखापत झाली. हा अपघात शुक्रवारी (दि.10) रात्री नऊच्या सुमारास सांगवीच्या रक्षक सोसायटी चौकाजवळ घडला.

सुधा परसराम विश्वकर्मा ( वय. 27, रा. निसर्ग पूजा सोसायटी, मानकर चौक, वाकड) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. दुचाकीवर मागे बसलेल्या मयूर भालके याच्या पायाला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी चारचाकी चालक पृथ्वी गोपाळ हेमदेव (वय.22, राजवीर पॅलेस, कुणाल आयकॉन रोड, पिंपळे सौदागर ) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आदित्य दुर्गाप्रसाद श्रीवास्तव ( वय.31, रा. काळा खडक रोड, वाकड ) यांनी शनिवारी (दि. 11) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हेमदेव हा आपल़ी चारचाकी गाडी ( एमएच 12 डीई 2032) वाहतुकीचे नियमांकडे दुर्लक्ष करत भरधाव वेगाने रक्षक चौकाकडे जात होता. त्यावेळी पुढे चाललेल्या ( एमएच 14 ईएफ 8206 ) या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली.

मृत महिला ही फिर्यादी आदित्य श्रीवास्तव यांची मेहुणी होती. पोलिसांनी चारचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सांगवी पोलीस करत आहेत.

Share this: