जुनी सांगवीमध्ये वाहनांची तोडफोड; तिघांना पोलिसांनी केली अटक
पिंपरी (वास्तव संघर्ष) :- पिंपरी-चिंचवडच्या सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन जणांच्या टोळक्याने सुमारे २४ वाहनांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तीन जणांना सांगवी पोलिसांनी अटक केली आहे.
बुद्ध हौसिंग सोसायटी, प्रियदर्शनी नगर, ममता नगर, संगम नगर, ढोरे नगर अशा दोन किलोमीटरच्या परिसरात वाहनांची तोडफोड झाली आहे. आधीच लॉकडाउनमुळे अनेकांची आर्थिक स्थिती बिकट बनलेली असताना अशा प्रकारे वाहनांच्या तोडफोडीचे नुकसान कोण भरुन देणार असा प्रश्न नागरिक करीत आहेत. घटनेचा अधिक तपास सांगवी पोलीस करीत आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात एखाद्या महिन्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा वाहनांच्या तोडफोडीचे सत्र सुरू होते. मध्यंतरी मागील एक महिन्यापूर्वी वाहनांच्या तोडफोडीच्या घटना समोर आल्या होत्या. सुमारे महिनाभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा ही घटना समोर आली आहे.