प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ऑनलाईन अर्जची रक्कम निशुल्क करावी : सतीश कदम
पिंपरी(वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेसाठी दिनांक १५ ऑगस्टपासून नागरिकांना ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरूवात झाली आहे, च-होली, बो-हाडेवस्ती, रावेत येथे 3 हजार 664 घरे उपलब्ध होणार आहेत. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरतांना पाच हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्ट भरणे बंधनकारक आहे, प्रत्येकाला हक्काचे घर देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून त्याची पूर्तता केली जात आहे. मात्र, कोरोना व्हायरसमुळे अनेक लोकांनी आपल्या नोकर्या गमावल्या आहेत. हातावर पोट असणाऱ्यांचे तर या काळात प्रचंड हाल झाले. दोन वेळच्या जेवणाचे ही त्यांचे चांगलेच हाल होत आहे
त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनाची फॉर्म भरतानंची रक्कम कमी करून ती निशुल्क करण्यात यावी अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रुपचे अध्यक्ष सतीश कदम यांनी महापालिका आयुक्त श्रावण हार्डिकर व महापौर माई ढोरे यांच्याकडे केली आहे, दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या ही रक्कम पाच हजार रूपये असल्याने आर्थिकदृष्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी सध्या कोरोना सारख्या महामारीच्या काळात पाच हजार रूपये भरणे शक्य नसल्याने तसेच आर्थिकदृष्या दुर्बल घटकातील नागरिक या योजने पासुन वंचित राहू नये यासाठी आयुक्तांनी पुढाकार घेऊन ही रक्कम कमी करून नारिकांना देखील दिलासा देण्याचा प्रयत्न आयुक्तांनी करावा अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रुपचे अध्यक्ष सतीश कदम यांनी केली आहे.