क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

काळेवाडीत वडापावच्या गाडीवरून तरुणाचा निर्घृणपणे खून

पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी येथे वडापावच्या गाडीवरून एका तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 19) रात्री घडली आहे.

शुभम जनार्धन नखाते (वय 30, रा. साईबाबा मंदिर, तापकीर चौक, काळेवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

राज तापकीर , ज्ञानेश्वर राजेंद्र पाटील ( वय 23 ) , प्रवीण ज्योतीराम धुमाळ ( वय 21 ) , अविनाश धनराज भंडारे ( वय 23 ) , अजय भारत वाकोडे ( वय 23 ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत . त्यांच्यासह मोरेश्वर रमेश आष्टे ( वय 21 ) , प्रेम वाघमारे ( सर्व रा . काळेवाडी ) यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील 15 दिवसापूर्वी वडापावच्या गाड्यावरून मयत शुभम आणि आरोपी यांच्यामध्ये भांडण झाले होते. त्या भांडणाच्या रागातून त्यांच्यात बुधवारी (दि. 19) दुपारी साडेचार वाजता पुन्हा भांडण झाले.

बुधवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास आरोपींनी मयत शुभम याला तापकीर चौकातील धोंडीराज राज मंगल कार्यालय येथे गाठले. शुभमच्या डोक्यात कोयत्याने सपासप वार केले. त्यातच शुभमचा मृत्यू झाला.

पोलिसांना माहिती मिळताच वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. मयत शुभम याच्यावर विनयभंग आणि पोक्सोचा गुन्हा दाखल आहे.वाकड पोलिसांनी गणेशोत्सव आणि मोहरमच्या पार्श्वभूमीवर रूटमार्च काढला होता. त्याच दिवशी हा खुनाचा प्रकार घडला आहे.

Share this: