बातम्यामहाराष्ट्र

दलित बांधवांनो मला माफ करा; भारतीय संविधानाच्या अवमान प्रकरणी अभिनेता प्रवीण तरडेंचा माफीनामा

पिंपरी (वास्तव संघर्ष) : गणरायाचे आज मोठ्या भक्तीभावाने आगमन झाले . कोरोना संकटामुळे अनेकांना डेकोरेशन करण्यासाठी फुले, साहित्य, तोरणे मिळालेली नाहीत. यामुळे काहींनी वेगवेगळ्या कल्पना लढवून त्यांच्या घरी बाप्पाचे स्वागत केले आहे. मात्र मुळशी पॅटर्न फेम अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी घरच्या गणपतीची पुस्तकांचे मनोरे रचत प्रतिष्ठापना केली आहे.

कल्पना चांगली होती मात्र, गणपतीच्या मूर्तीच्या पाटाखाली संविधानाची प्रत ठेवल्याने वादाला तोंड फुटले आहेत.त्यामुळे तमाम भारतीयांनी तरडे यांच्या या कृतीबद्दल चिंड आणि संताप व्यक्त केला आहे. अभिनेते प्रविण तरडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी देखील मागणी होत आहे . अखेर त्यांनी व्हिडिओ शेअर करत सर्वांची माफी मागितली आहे. आणि त्यांची ती पोस्ट देखील डीलिट केली आहे.

व्हिडिओ मध्ये अभिनेते प्रविण तरडे म्हणाले ‘माझ्या घरी यंदा बाप्पासाठी पुस्तक गणपती अशी संकल्पना होती. बुद्धीची देवता आणि बुद्धीचं सर्वात मोठं प्रतिक अशी माझी भावना होती. असं असलं तरी मी केलेली चूक अनेकांनी माझ्या लक्षात आणून दिली. आरपीआय, भीम आर्मी तसंच लातूर आणि पुण्यातील संघटनांनी मला याची जाणीव करुन दिली. मी सर्व दलित बांधवांची, ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यांची सर्वांचीच जाहीर माफी मागतो’

Share this: