बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी विधानसभेच्या मतदारांना आजी व माजी या दोन्ही आमदारांनी फसविले- प्रविण उर्फ बाळासाहेब गायकवाड

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी विधानसभेच्या मतदारांना आजी व माजी या दोन्ही आमदारांनी फसविले असल्याचा सणसणीत आरोप पिंपरी विधानसभा मतदार संघाचे वंचित आघाडीचे उमेदवार प्रविण उर्फ बाळासाहेब गायकवाड यांनी केला आहे.

वंचित आघाडीचे उमेदवार प्रविण उर्फ बाळासाहेब गायकवाड यांनी प्रचारात आघाडी घेतली असून मतदार संघात त्यांच्या प्रचार रॅली सुरू असून तरुण कार्यकर्ते व महिलांचा त्यांना चांगला पाठींबा मिळत आहे.

पिंपरीतील एका कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना प्रविण उर्फ बाळासाहेब गायकवाड म्हणाले की “यापूर्वी पिंपरी विधानसभा मतदार संघाला दोन निष्क्रिय आमदार लाभले.या आजी व माजी दोन्ही आमदारांनी पिंपरी विधानसभा मतदार संघातील मतदारांची फसवणूक केली आहे.झोपडपट्टी पुनर्वसन,तरुण व सुशिक्षितांची बेरोजगारी या प्रश्नाकडे त्यांनी डोळेझाक केली आहे.त्यामुळे पिंपरी विधानसभा मतदार संघातील जनतेने या फसविणाऱ्या आजी व माजी या दोन्ही आमदारांना घरी बसविले पाहिजे”

यावेळी पिंपरी चिंचवड शहर वंचित आघाडीचे शहराध्यक्ष इंजि.देवेंद्र तायडे व पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this: