क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

तू माझ्या बायकोला तिच्या आईकड़े का सोडलीस ,असं म्हणत महिलेला कु-हाडीने मारहाण ;चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

चिखली (वास्तव संघर्ष) :पिंपरी चिंचवड येथील चिखली परिसरातील
कृष्णानगर पोलीस लाईन येथे घरी येवून तु माझ्या बायकोला तिच्या आईकड़े का सोडलीस , माझे बायकोला माझेकडे आता आणून दे नाहीतर तु माझ्याकडे ये असं म्हणत एका महिलेला कु-हाडीने मारहाण करत गंभीर जखमी केले आहे.

सिंधु कुंडलिक मोहिते (वय २६ वर्ष धंदा नोकरी रा . बिल्डींगनंबर ३/६ कृष्णानगर पोलीस लाईन , चिंचवड पुणे)यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनोद हिरामण चव्हाण , (वय ३५ वर्ष रा . येलवाडी , देहूगाव पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नमुद तारीख वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी हे त्यांचेघरी असताना त्यांची बहिण नामे मुक्ता हिचा पती विनोद चव्हाण ( यातील आरोपी ) हा फिर्यादीचे घरी येवून फिर्यादीस म्हणाला की तु माझ्या बायकोला तिच्या आईकड़े का सोडलीस , माझे बायकोला माझेकडे आता आणून दे नाहीतर मला आज रात्री तुझ्याकडे रहायला दे असे म्हणाला, तेव्हा फिर्यादीने त्यास तुम्ही आताचे आता येथून निघून जा नाहीतर मी आरडा ओरडा करेन असे म्हणाले, असता आरोपी याने त्याचे अंगावर घातलेल्या रेनकोट मध्ये लपवून आणलेली कु – हाड बाहेर काढून तुझा मी जिवच घेतो असे म्हणून त्याचे हातातील कु – हाड फिर्यादीचे डोक्यात , मानेवर व उजवे हाताचे मनगटाजवळ मारून गंभीर जखमी करून फिर्यादीस जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.अधिक तपास चिखली पोलीस करीत आहेत.

Share this: