अन्यायकारक अटक केलेल्या शाहीरांना त्वरित मुक्त करा: जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना निवेदन
पिंपरी (वास्तव संघर्ष) :बुद्ध, कबीर, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपति शाहू महाराज,डॉ बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, या आदर्श पुरुषांच्या विचाराने प्रभावित होऊन समाजात जनजागृती व समाज प्रबोधनाचे कार्य करत असतांना दिनांक 8/09/2020 रोजी शाहीर रमेश गायचोर, व शाहीर सागर गोरखे यांना अटक करण्यात आली त्यानंतर दुसर्याच दिवशी ज्योती जगताप यांना अटक करण्यात आली. या घटनेचा लढा यूथ मूव्हमेंटने निषेध नोंदवला आहे.तसेच जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांना निवेदन देण्यात आले आहे.
समाजात प्रबोधनाचे कार्य करणे गुन्हा आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. समाजात प्रबोधन कार्य व्यतिरिक्त कोणतेही गैर कृत्य अथवा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्या सारखे कोणते कृत्य यांच्याकडून घडले आहे. याची माहिती आपण घ्यावी. व खरच प्रबोधनाचे कार्य करणारी ही मंडळी देशद्रोही आहेत का याची शहानिशा करावी. देशद्रोहाचे कोणतेही कार्य कबीर कला मंचाचा कोणत्याही शाहीराकडून घडले नसताना त्यांच्यावर देशद्रोहाचा ठपका ठेऊन अन्यायकारक अटकेची कारवाई होत असताना आपण गप्प का असा प्रश्न जिल्हा अधिकारी डॉ राजेश देशमुख यांना विचारन्यात आला आहे.
भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या दिव्य संदेशा नुसार “अन्याय करणार्यां पेक्षा अन्याय सहन करणारे जास्त गुन्हेगार असतात” तर मग ह्या अन्यायाचा संविधानिक मार्गाने प्रतिकार करण्यास सरकार आम्हास भाग पाडत आहे. सदर प्रकरणी लक्ष घालून विषय गांभीर्यपूर्वक हाताळावा व अन्याय कारक झालेल्या अटकातून शाहीरांना त्वरित मुक्त करून त्यांना न्याय द्यावा अशा आशयाचे पत्र जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांना लढा यूथ मूव्हमेंट चे प्रमुख प्रमोद क्षिरसागर, अमित गोरे, भैयासाहेब ठोकळ, प्रमोद अवघडे, आनंद शेट्टी आदींचा उपस्थितीत देण्यात आले.