निगडीत एका तरूणाला आठ ते दहा टोळक्याने दगड, विटा आणि कोयत्याने केले वार ;आरोपींना पोलिसांनी केली अटक
निगडी(वास्तव संघर्ष) – पिंपरी चिंचवडच्या निगडी परिसरातील यमुनानगर येथील अपंग शाळेसमोर एका तरूणाला आठ ते दहा टोळक्याने दगड व विटा आणि कोयत्याने वार करत तरुणाला गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे . ही घटना बुधवारी ( दि .23 ) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली आहे .
याप्रकरणी जखमी तरुण अख्तर ऊर्फ मुन्ना जमालउद्दीन शेख ( वय 21 , दत्तकृपा हौसिंग सोसायटी , ओटास्किम , निगडी ) याने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .
शाहिद शेख ( रा . अंकुश चौकाजवळील झोपडपट्टी , ओटास्किम , निगडी , पुणे ) आकाश बसुराज दोडमणी ( वय 24 , रा . श्रीराम हौसिंग सोसायटी , ओटास्किम , निगडी , पुणे ) सातलिंग सिद्धराम संगळगी ( वय 18 , रा . राजनगर , ओटास्किम , निगडी , पुणे ) आदेश माने , मारुती धोत्रे , ओंकार दाहिजे , भारत कांबळे ( रा . दळवीनगर झोपडपट्टी , ओटास्किम , निगडी , पुणे ) गणेश सिद्धराम बनसोडे ( वय 16 , रा . राजनगर , निगडी , पुणे ) अजय देवकर , अजय केशव या आठ ते दहा आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे .
त्यापैकी आरोपी शाहिद शेख व सातलिंग सिद्धराम संगळगी यांना अटक केली असून आरोपी गणेश सिद्धराम बनसोडे हा अल्पवयीन असुन त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी हे त्यांच्या मैत्रिणी सोबत निगडीतील यमुनानगर अपंग शाळेसमोर बोलत उभे राहिले होते . त्यावेळी जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपी शाहिद शेख याने त्याच्या हातातील धारदार लोखंडी कोयता फिर्यादीच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले . आरोपी आकाश दोडमणी याने त्याचे हातातील दगड फिर्यादी यांच्या पाठीमध्ये मारला . दोन्ही आरोपींनी फिर्यादीच्या हातापाया वर लोखंडी कोयत्याने वार करून त्याला जखमी केले . इतर आरोपींनी फीर्यादीला दगड विटा मारत लाथा बुक्यानी मारहाण केली . तसेच फिर्यादी ची एमएच -14 एचएफ -8831 ही दुचाकी तोडून फोडून गाडीचे नुकसान केले. अधिक तपास निगडी पोलीस करीत आहेत.