क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

नेहरूनगर येथील गोल्डमॅन आणि त्याच्या कुटुंबाविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी (वास्तव संघर्ष) :पत्नीचा शारीरिक, मानसिक छळ आणि गर्भपाताची औषधे देऊन तिचा गर्भपात केल्याप्रकरणी नेहरूनगर येथील प्रसिद्ध गोल्डमॅन विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्यांच्या कुटुंबाच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

याबाबत पिडीत महिलेने गुरुवारी (दि. 22) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

गोल्डमॅन सनी नाना वाघचौरे (वय 31), सासू आशा नाना वाघचौरे (वय 56), सासरे नाना वाघचौरे (वय 60), नणंद नीता गायकवाड (वय 36, सर्व रा. नेहरूनगर, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 23 मार्च 2011 पासून ते 22 ऑक्टोबर 2020 या कालावधीत आरोपींनी फिर्यादी महिलेचा वारंवार शारिरीक आणि मानसिक छळ केला तसेच गर्भपाताची औषधे देऊन तिचा गर्भपात केला . आरोपींनी विवाहीतेकडे आई-वडिलांकडून गृहोपयोगी वस्तू आणण्याची मागणी केली. त्यानुसार विवाहितेच्या आई-वडिलांनी वस्तू दिल्या. त्यानंतर पती सनी याने बाहेरील स्त्रियांशी संबंध ठेऊन विवाहितेला मारहाण करत शिवीगाळ केली.अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

Share this: