क्राईम बातम्यामहाराष्ट्र

ॲड. उमेश मोरे अपहरण आणि खून प्रकरण; पुणे बार असोसिएशनचे सचिव अ‍ॅड. घनःश्याम दराडेला अटक

पिंपरी (वास्तव संघर्ष) शिवाजीनगर न्यायालयात वकिली करणाऱ्या ॲड. उमेश मोरे यांच्या अपहरणाचा गुन्हा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा छडा लावताना उमेश मोरे यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात आता पुणे बार असोसिएशनचे विद्यमान सचिव अ‍ॅड. घनःश्याम दराडे याला अटक करण्यात आली आहे.

तसेच अ‍ॅड. घनःश्याम दराडे याला कोर्टाने 31 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात याआधी शिवाजीनगर पोलिसांनी याप्रकरणी कपिल विलास फलके (वय 34), दीपक शिवाजी वांडेकर (वय 28) आणि रोहित दत्तात्रय शेंडे (वय 32) या तीन आरोपींना अटक केली होती.

आरोपींनी 1 ऑक्टोबर रोजी शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरातून उमेश मोरे यांचे अपहरण करुन त्यांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर आरोपी मृतदेह ताम्हिणी घाटात घेऊन गेले. आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पेट्रोल टाकून मृतदेह जाळण्यात आला.

दरम्यान गुन्ह्याचा तपास सुरू असताना शिवाजीनगर पोलिसांनी कोर्ट परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना संशयास्पद अवस्थेत तीन व्यक्ती दिसून आले. त्यानुसार पोलिसांनी सुरुवातीला आरोपी कपिल फलके आणि इतर दोन आरोपींना अटक केली होती

Share this: