क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

‘ कोणत्या पोलीसांना बोलवतो बोलव’ असे म्हणुन एकाच्या अंगावर कोयता उगारला ;पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरीतील संततुकारामनगर येथे पोलिसांना सांगतो म्हणणा-या एकाच्या अंगावर कोयता  उगारल्याप्रकरणी दोघांना पिंपरी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दिनेश विश्वास पाटील (वय ३५ वर्षे रा. संततुकारामनगर पिपंरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

रोहन नामदेव जाधव (वय १ ९ वर्षे रा . अक्षय  सोसायटी , संत तुकाराम नगर पिंपरी पुणे) हर्षल शिवाजी साबळे ( वय १ ९ वर्षे रा.रामराज्य प्लॅनेट , ए विंग , फ्लॅट नं २०६ लांडेचाळ कासारवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास पिंपरीतील संततुकारामनगर सार्वजनिकरोडवर यातील फिर्यादी दिनेश पाटील  यांनी नमुद आरोपी रोहन  जाधव आणि हर्षल  साबळे  यांना दिनांक १३/११/२०२० रोजी टोकल्याचे व पोलीसांना बोलवितो असे म्हणाल्याचे कारणावरुन फिर्यादी दिनेश पाटील यांचे समोर समोर लोखंडी कोयते काढुन’ हाच होता ना रे तो आईघाला , कोणत्या पोलीसांना बोलवतो बोलव’ असे म्हणुन अंगावर धावुन जाऊन कोयते उगारुन , फिर्यादी दिनेश पाटील यांना शिवीगाळ केली. अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत. औ

Share this: