क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरीतील निराधारनगर येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा ;आठ जणांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी-चिंचवड शहरातील निराधारनगर झोपडपटटी येथे अवैधरित्या सुरु असलेल्या अंदर – बाहर जुगार अड्डयावर पिंपरी – चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने छापा टाकला . त्यात पोलिसांनी एक लाख 835 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला . तर जुगार अड्डा चालवणा – यासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

जुगार अड्डा चालवणारा आरोपी सुनील राजेंद्र मोरे ( वय 38 , रा . निराधार नगर , पिंपरी ) आणि त्याचे सात साथीदार यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , पिंपरी येथील निराधार नगर झोपडपट्टी येथे अंदर – बाहर हा जुगार सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली . त्यानुसार पोलिसांनी जुगार अड्डयावर छापा मारून कारवाई केली . पोलिसांनी 46 हजारांची रोख रक्कम , 54 हजारांचे सहा मोबाईल फोन , 25 रुपयांचे पत्त्याचे कॅट असा एकूण एक लाख 835 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला . आरोपी सुनील मोरे हा जुगार अड्डा चालवत होता . त्याच्यासह जुगार खेळणा – या अन्य सात जणांवर महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

Share this: