भोसरीत तरूणींची आठ ते दहा साथीदारासह दहशत ;कंपनी मालकासह कर्मचा-यांवर केला प्राणघातक हल्ला
भोसरी (वास्तव संघर्ष) :भारत बंदच्या पार्श्वभूमीवर भोसरी एमआयडीसीतील पुना पाॅलिमर्स या कंपनीत एका वीस वर्षीय तरूणींची आपल्या आठ ते दहा साथीदारासह दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न समोर आला आहे. यामध्ये कंपनी मालकावर आणि तेथील कर्मचा-यांवर प्राणघातक हल्ला केला आहे. ही घटना मंगळवारी (दि.8) दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे.
राजेंद्रनिवृत्ती बोरसे (वय ५० , रा.जय हनुमान सोसायटी , घरकुल चिखली , प्रधिकरण) असे मारहाण झालेल्या कंपनी मालकांचे नाव असून त्यांनी याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मनिष रामक्षीरसागर हनुमान ( वय २० रा . रक्षकचौक रोड , प्रकाशजनरल स्टोअर जवळ , काटे वस्ती , पिंपळे सौदागर) अजय संगितराव वाघमारे( वय १८ वर्ष रा.पिंपरी) तेजस सुडके ( पुर्ण नांव , पत्ता माहीत नाही ) व इतर ६ ते ७ अनोळखी व्यक्ती ( नांव पत्ता माहीत नाही ) या आरोपी विरोधात भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी राजेंद्रनिवृत्ती बोरसे यांची भोसरीमध्ये पुना पाॅलिमर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे. या कंपनीमध्ये गणेश एंटरप्राईजेस नावाच्या कॉन्ट्रक्ट मध्ये काम करणारे कर्मचारी आरोपी मनिष क्षीरसागर आरोपी अजय वाघमारे आरोपी तेजस सुडके हे काम करतात. त्यांनी या कंपनीमध्ये मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास त्यांच्या इतर सहा ते सात साथीदारांना बोलावलं. त्यानंतर त्यांनी फिर्यादी राजेंद्रनिवृत्ती बोरसेव व त्यांच्या कंपनीमध्ये काम करत असणारे कामगार शिवम राजपुत , यशपाल राजपुत यांना किरकोळ वादातुन लोखंडी पाईप तसेच दगडांनी मारहाण केले. यामुळे फिर्यादी राजेंद्रनिवृत्ती बोरसे यांचा डावा हात फॅक्चर झाला असुन त्यांच्या डोक्यास दोन टाके पडले.
तर शुभम राजपुत याच्या डाव्या हातास फॅक्चर झाले. तसेच डोक्यात पाईप मारुन त्यांस जखमी केले ज्यामुळे त्याचे डोक्यास एकुण ८ टाके पडले आहेत. त्याच प्रमाणे यशपाल रजपुत यांस लोखंडी पाईपने तसेच दगडांनी शरीराचे विविध भागावर मारले व त्यांस जखमी केले तसेच फिर्यादी राजेंद्रनिवृत्ती बोरसे व त्यांचे कंपनीतील इतर कामगारांना वाईट वाईट शिवीगाळ करत मर्डर करण्याची धमकी देत कंपनीचे नुकसान केले आहे. अधिक तपास भोसरी एमआयडीसी पोलीस करीत आहेत.