क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने मातंग एकता आंदोलन संघटनेच्या वतीने अभिवादन
पिंपरी (वास्तव संघर्ष) : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने पिंपरीतील महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मारकात सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात.
“स्री शिक्षणाचा पाया ज्योतिबा फुले यानी रचला तर सावित्रीबाई या सावली बनल्या म्हणूनच आज अनेक सावित्री या प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमठवीत आहेत. सावित्रीबाईंना पहिली शिक्षिका होण्याचा मान मिळाला. म्हणूनच मुक्ता साळवें सारख्या अनेक महिला तयार झाल्या. संपूर्ण आयुष्यभर सावित्रीबाई याना अनेक अडचणी व संकटावर मात करून महिलांना सक्षम बनविले आहे.असे प्रतिपादन संघटनेचे पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष मोहन वाघमारे यांनी केले.”
यावेळी पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष मकरध्वज यादव, संघटनेचे पिंपरी चिंचवड शहर युवक आघाडी चे अध्यक्ष विशाल कसबे, कष्टकरी कामगार पंचायत चे सरचिटणीस प्रल्हाद कांबळे, संघटक विठ्ठल कळसे व उपाध्यक्ष साहेबराव थोरात यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.