बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी चिंचवड शहरात होळी आणि धुलीवंदनला कडक लॉकडाऊन करण्याचा पालिकेचा निर्णय

पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे . त्यातच पालिकेच्या वतीने सातशे पेक्षा जास्त कोरोना रूग्ण संख्या झाल्यावर पुर्ण शहर लाॅकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता माञ आज घडीला दिवसागणिक दिड हजार रुग्णांची संख्या झाली आहे . कोरोनाचा संसर्ग आणि प्रादुर्भाव पसरण्याची भीती लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे . त्या पार्श्वभूमीवर पुण्यातबरोबर पिंपरी चिंचवड शहरात देखील होळी आणि धुलीवंदनच्या पाश्र्वभूमीवर लाॅकडाऊन करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे .

येत्या रविवारी आणि सोमवारी होळी आणि धुलीवंदन आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने पुणे आणि पिंपरी चिंचवड क्षेत्रामध्ये साजरी होणारी होळी आणि धुलीवंदन सण उत्सव एकत्रित येऊन सार्वजनिक ठिकाणी साजरे करण्यास मनाई करण्यात आली आहे .

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती अॅड नितीन लांडगे यांनी याबाबत पञकार परिषदेत माहिती दिली आहे ते म्हणाले, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊ लागला आहे . त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून होळी आणि धूलिवंदन हा उत्सव खासगी किंवा सार्वजनिक जागेत साजरा करण्यात मनाई करण्यात येत आहे . तसेच दोन दिवस कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. जो कोणी या नियमांचे पालन करणार नाही , त्याच्यावर कारवाई करण्यात येईल , असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे . त्यामुळे यंदा खाजगी किंवा सार्वजनिक ठिकाणी होळी साजरी करण्यावर निर्बंध लागू करण्यात आले आहे .

Share this: