बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी चिंचवड उपमहापौर हिराबाई घुले यांच्या मुलावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवनिवार्चित उपमहापौर हिराबाई घुले यांच्या मुलावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपमहापौरपदी निवड झाल्यानंतर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असताना महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर गर्दी जमवून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी उपमहापौरांच्या मुलावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

चेतन गोवर्धन घुले ( रा . गणेशनगर , बोपखेल ) असे गुन्हा दाखल केलेल्या उपमहापौरांच्या मुलाचे नाव आहे . त्यांच्यासह त्यांच्या ७० कार्यकर्त्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

दत्तात्रय बारकु भोर ( वय ६० , रा . कृष्णानगर , चिंचवड ) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे . कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत . तसेच पिंपरी – चिंचवड पोलिसांनी देखील याबाबत जमावबंदीचा आदेश लागू केला आहे . २३ मार्च रोजी हिराबाई घुले यांची शहराच्या उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली . या निवडीनंतर उपमहापौरांचा मुलगा चेतन घुले हे त्यांच्या ७० कार्यकर्त्यांसह पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर एकत्र आले . गर्दी करून घोषणाबाजी केली . त्यामुळे सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

Share this: