क्राईम बातम्यामहाराष्ट्र

90 हजारांची लाच घेताना अभियंता महिलेला पोलिसांनी केली रंगेहाथ अटक

तळेगाव (वास्तव संघर्ष) :पवना नदीतून शेतीसाठी पाणी उपसा करण्यासाठी शेतकऱ्याकडून 90 हजारांची लाच घेतल्या प्रकरणी रंगेहाथ उपसा जलसिंचन विभागाच्या महिला सहायक अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे . ही कारवाई मंगळवारी ( दि . 6 ) रोजी दुपारच्या दिडच्या सुमारास घडली असून आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

डॉ.फिरोज तालेब खंबाटा (वय -५६, रा .१२०२ फोरम , उदयबाग , बी.टी . कावडे रोड , वानवडी पुणे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मोनिका रामदास ननावरे (वय -३१ वर्षे , सहायक अभियंता , उपसा जलसिंचन उप विभाग , पवनानगर , तळेगाव रा.ठिकाण – स्म नं ३०१ रिव्हरव्हॅली सोसायटी आंबी रोड , वराळे , तळेगाव , ता.मावळ) असे लाचखोर आणि अटक केलेल्या महिलेचे नाव आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोनिका ननावरे उपसा जलसिंचन विभाग पवनानगर येथे सहायक अभियंता वर्ग 2 या पदावर काम करतात . फिर्यादी फिरोज खंबाटा यांची मावळ तालुक्यातील करूंजगाव येथे १.९ २ हेक्टर शेती आहे . त्यांच्या शेतीला पवना नदीतून पाणी उपसा करण्याची परवानगी देण्यासाठी आरोपी मोनिका ननावरे हिने 1 लाख 20 हजारांची लाच मागितली . चर्चेअंती 90 हजार रुपये देण्याचे ठरले . त्यानुसार मंगळवारी दि (6)रोजी मावळ येथील एका गाडीच्या डीक्कीत ही रक्कम फिर्यादी यांना ठेवण्यास सांगितली. दरम्यान एसीबीने सापळा लावून आरोपी महिलेला रंगेहाथ पकडले .अधिक तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहेत.

Share this: