क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

निगडीतील ओटास्कीम येथे तुफान राडा ;सिमेंटचा ब्लॉक डोक्यात घालून एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न

निगडी (वास्तव संघर्ष) : निगडीतील ओटास्कीम येथे जुन्या भांडणाचा राग मनात धरून सात ते आठ जणांच्या टोळक्याने तुफान राडा करत एकाला सिमेंटचा ब्लॉक डोक्यात घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना मंगळवारी (दि.20) रोजी दुपारच्या दीडच्या सुमारास तथागत हौसींग सोसायटी बिल्डींग नंबर एकच्या पार्किंगमधे घडली आहे.

श्रीराम प्रकाश कांबळे (वय -२८ वर्ष ,रा- बि.नं .४ रुम नं .४०७ भिमाई हौसिंग सोसायटी ओटास्किम निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी, गुडघी सन्या (पुर्णनाव पत्ता माहीत नाही ), अविनाश राहुल घोंगडे (वय अंदाजे २३ वर्ष रा – बि.नं .०१ पीसीएमसी ओटास्किम निगडी ), प्रसादनंदकुमार बहुले( वय अंदाजे २५ वर्ष रा – आण्णाभाऊ साठे वसाहत निगडी ) संतोष नरेश वाल्मिकी (वय अंदाजे २० वर्ष रा – बि.नं .०१ पीसीएमसी कॉलनी , निगडी ) निखील रामदास साळवे (वय अंदाजे २१ वर्ष रा – रुपी नगर), दुर्वेश भिंगारे (वय अंदाजे २२ वर्ष रा बि.नं .०२ पीसीएमसी कॉलनी ओटास्किम , निगडी ) साहील शेख (रा.बिल्डींग पीसीएमसी कॉलनी ओटास्किम निगडी ) योगेश ऊर्फ किडक्या राजभोग ( वय- २३ वर्षे रा.रुपी नगर नं .०२ निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी दिडच्या सुमारास सात ते आठ आरोपींनी आपआपसांत संगणमत करुन फिर्यादी श्रीराम कांबळे यांचा धाकटा भाऊ शक्तिमान प्रकाश कांबळे (वय -२३ वर्ष , रा बि.नं .४ रुम नं .४०७ भिमाई हौसिंग सोसायटी ओटास्किम निगडी) यास जुन्या भांडणाचा राग मनात धरुन त्याचे मित्र गप्पा गोष्टी करीत असताना अचानक वरील आठही आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून यातील अविनाश राहुल घोंगडे , प्रसादनंदकुमार बहुले , संतोष नरेश वाल्मिकी, निखील रामदास साळवे , दुर्वेशभिंगारे , साहील शेख , योगेश ऊर्फ किडक्या, राजभोग यांनी लाठ्या काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली व यातील मुख्य आरोपी अविनाश घोंगडे याने शक्तिमान प्रकाश कांबळे यास त्याचे जवळ जमीनीवर पडलेल्या सिमेंटचा ब्लॉक डोक्यात मारुन त्यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि हातामध्ये लाठ्या काठ्या घेवून ओरडत पळून जात परिसरात दहशत निर्माण केली. अधिक तपास निगडी पोलीस करीत आहेत.

Share this: