आरोग्यबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

जागतिक परिचारिका दिनानिमित्त खराळवाडी दवाखान्यातील नर्स आणि डाॅक्टरांचा सन्मान

पिंपरी (वास्तव संघर्ष) :आज जागतिक परिचारिका दिवस अर्थात नर्स डे गेल्या वर्षभरापासून कोरोना या संसर्गजन्य रोगाने जगभरात थैमान घातले आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेली कोरोना रूग्णांची संख्या आणि त्यांच्या मृत्यूचे आकडे हे सर्वसामान्यांची झोप उडवत आहेत. अशा परिस्थितीतही परिचारिका मोठ्या हिंमतीने रूग्णसेवेला प्राधान्य देत आहे.

पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी परिचारिकाने महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आज जागतिक परिचारिकाचे औचित्य साधुन आपल्या कार्याचा कुठलाही दिखावा न करता जो वर्ग खरा कोविड़ योद्धा आहे अश्या खराळवाडी मधील प्राथमिक आरोग्यकेंद्र व लसीकरण केंद्रावरील सर्व नर्स आणि डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला.

यामध्ये पिंपरीतील खराळवाडी दवाखान्यातील नर्स वैशाली मोहिते, भाग्यश्री – नाळे, शेरली घोरपडे, अश्विनी पवळ, उर्मिला मैदाड यांचा खराळवाडी गांधीनगर मधील सामाजिक कार्यकर्ते तर्फे पुष्पगुच्छ व भारतमातेची प्रतिमा देऊन गौरविण्यात आले.

यावेळी राजन गुंजाळ, विशाल पवळ, कासीम शेख, शिवा कांबळे, विजय नडविनकेरी, सोमनाथ चव्हान, प्रदीप कलापुरे, कृष्णकांत कांबळे यांच्या तर्फे करण्यात आला .

Share this: