क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

आमदार आण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे याला रत्नागिरीतून अटक

पिंपरी (वास्तव संघर्ष) :राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे याला रत्नागिरीतील पावसमधून अटक करण्यात आली आहे. तानाजी पवार यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी सिद्धार्थ बनसोडे याच्यावर निगडी आणि पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

काही दिवसांपूर्वी आमदार आण्णा बनसोडे यांच्यावर त्यांच्या कार्यालयात गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणातील आरोपी तानाजी पवारने यांनी उलट आण्णा बनसोडे यांच्या मुलावर आणि त्याच्या साथीदारांवरच अपहरण आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता.सिद्धार्थ बनसोडेवर गुन्हा दाखल करण्यात आला.

तानाजी पवार यांच्या कंपनीकडूनही सिद्धार्थवर कर्मचाऱ्याला मारहाण आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात पोलिसांना सिद्धार्थ बनसोडेचा शोध होता. अखेर रत्नागिरी जिल्ह्यातील पावसमधून त्याला अटक करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कंत्राटदार सिजू अँथनी यांच्या कार्यालयात सिद्धार्थ बनसोडे ११ मे रोजी दुपारी घुसले होते. त्यानंतर दोघा कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला. लोखंडी टॉमीसारख्या घातक शस्त्राने दोघांवर हल्ला केल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं आहे. अँथनी यांच्या कंपनीचे मॅनेजर तानाजी पवार कुठे आहेत, हे कर्मचाऱ्यांनी न सांगितल्याच्या रागातून आमदारपुत्र आणि पीएसह दहा जणांनी हा जीवघेणा हल्ला केल्याचा उल्लेख तक्रारीत आहे. दरम्यान, आमदार बनसोडे यांच्या पीएला देखील ताब्यात घेण्यात आले आहे

Share this: