क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

धक्कादायक : पोटच्या मुलानेच तोडली आईच्या हाताची बोटे

हिंजवडी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड शहरातील ताथवडे भागात राहणाऱ्या पोटच्या मुलाने आपल्या आईला दारूच्या नशेत शिवीगाळ करून मारहाण केली. मारहाण वाचविण्यासाठी आईने एका हाताने बेल वाजवून दुसऱ्या हाताने दरवाजा बंद करत होत्या. त्यावेळी त्यांचा हात दरवाजात अडकला हे समजताच मुलाने मुद्दाम जबरदस्तीने दरवाजा बंद केला. यामुळे आईची दोन बोटे जागेवरच तुटुन पडली. ही घटना सोमवारी ( दि. 30 ) मध्यरात्री साडेबारा वाजता श्रीराम आरंभ सोसायटी ताथवडे येथे घडली .

शकुंतला शिवाजी धोंडे ( वय 46, रा. ताथवडे ) असे जखमी आईचे नाव आहे.

तुषार शिवाजी धोंडे ( वय 30, रा . ताथवडे ) असे अटक केलेल्या आरोपी मुलांचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माहितीनुसार, फिर्यादी शकुंतला या आरोपी तुषार यांच्या नात्याने आई लागतात त्या घरी असताना आरोपी मुलगा दारू पिऊन घरी आला. घरगुती भांडणाच्या कारणावरून आरोपी तुषार याने आई शकुंतला यांना मारहाण करून शिवीगाळ केली.शकुंतला एका हाताने बेल वाजवून दुसऱ्या हाताने दरवाजा बंद करत होत्या. त्यावेळी त्यांचा हात दरवाजात अडकला. त्यानंतर तुषार याने जाणीवपूर्वक दरवाजा बंद केला. त्यामुळे शकुंतला यांच्या हाताची करंगळी आणि त्या शेजारील बोट तुटून खाली पडले. अधिक तपास हिंजवडी पोलीस तपास आहेत.

Share this: