राष्ट्रवादीमध्ये विलास लांडे व मंगला कदम यांनी माझ्यावर अन्याय केला मात्र भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी मला न्याय दिला
पिंपरी (वास्तव संघर्ष ) :भोसरीचे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे माजी आमदार विलास लांडे व माजी महापौर मंगला कदम यांच्या पैशाच्या हव्यासामुळे पक्षातील कार्यकर्त्यांवर अन्याय होतो तसेच मी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीमध्ये पंधरा वर्षे झाली काम करत होतो त्यावेळेस विलास लांडे आणि मंगला कदम यांनी माझ्यावर अन्याय केला असा खळबळजनक आरोप वृक्ष प्राधिकरण समितीचे नवनियुक्त सदस्य आनंदा यादव यांनी महानगरपालिकेत झालेल्या पत्रकार परिषदेत केला.
यावेळी पञकार परिषदेत बोलताना यादव म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून सुमारे १५ वर्षे काम केले. मात्र, याकाळात पक्षाने एकाही महत्त्वाच्या पदावर काम करण्याची संधी दिली नाही. शेवटी २०१९ मध्ये आमदार महेश लांडगे यांच्यासोबत भाजपाचे काम करायला सुरूवात केली.
अखेर आमदार महेश लांडगे यांनी मला महापालिका वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्यपदी काम करण्याची जबाबदारी दिली. राष्ट्रवादीने मला कायम डावलले, पण आमदार लांडगे यांनी सावरले आहे, अशा भावनाही वृक्ष प्राधिकरण समितीचे नवनियुक्त सदस्य आनंदा यादव यांनी व्यक्त केल्या.