धक्कादायक : पतीने पत्नीला मामा सोबतच ठेवायला लावले अनैतिक संबंध ;भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
भोसरी (वास्तव संघर्ष) : भोसरी येथील एका विवाहीत महिलेला मुलगी झाली म्हणून तीचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच विवाहीतेवर स्वतःच्या मामासोबतच अनैतिक संबंध आहेत असे बोलून तू मामासोबतच अनैतिक संबंध ठेवायला सांगत वारंवार शिवीगाळ केली. याप्रकरणी पतीसह सासूसासरे यांच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. .ही घटना जानेवारी 2008 ते 2 जून 2021 या कालावधीत विवाहितेच्या घरी आणि सोलापूर, भोसरी या ठिकाणी घडली आहे.
याप्रकरणी पीडित विवाहितेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .
त्यानुसार आरोपी पती नाना पंढरीनाथ गेजगे( वय -38 वर्षे रा . अष्टविनायक कॉ . सदगुरु नगर भोसरी )आरोपी सासरे – पंढरीनाथ यशवंत गेजगे( वय-58 वर्षे ) सासू-सुंदरा पंढरीनाथ गेजगे (वय-55 वर्षे ) प्रदिप पंढरीनाथ गेजगे (वय-33वर्षे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या सासरी नांदत असताना यातील आरोपी यांनी संगनमत करुन फिर्यादी महिलेला तीनही मुली झाल्याच्या कारणावरुन तसेच वंशाला दिवा देत नाही असे म्हणुन वारंवार मानसिक त्रास दिला. तसेच फिर्यादी महिलेला ‘तु काळी ढुस आहेस असे टोचुन बोलुन कामधंदा करीत नाही . असे म्हणुन शेजारी राहाणा-या त्यांच्या भावकीतील दिपक गेजगे याचे विरुध्द हात धरला अशी खोटी केस पोलीसात दे असे म्हणाले.
आरोपी पतीने फिर्यादी महिलेला तीच्या मामाचे अनैतिक संबंध आहेत असा चारित्र्यावर संशय घेवून शिवीगाळ केली. या ञासाला कंटाळून फिर्यादीने पोलीस ठाण्यात धाव घेतली असता आरोपी प्रदिप गेजगे याने पोलीस ठाण्याच्या आवारात जात फिर्यादीच्या मावशीस शिवीगाळ , दमदाटी करुन फिर्यादी महिलेला नव – या सोबत जबरदस्तीने नांदायला जाणेस सांगुन मानसिक त्रास दिला. अधिक तपास भोसरी पोलीस करीत आहेत.