आरोग्यबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी चिंचवड शहरात ओमायक्रॉन विषाणूचा शिरकाव ;तब्बल सहा रुग्ण आढळले

पिंपरी (वास्तव संघर्ष ) : पिंपरी चिंचवड शहरात अखेर कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापौर माई ढोरे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे व काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.शहरात सहा रुग्णांना ओमायक्रॉन झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. 

24 नोव्हेंबर रोजी नायजेरिया देशातील लेगॉस शहरातून आपल्या भावाला भेटण्यासाठी आलेली 44 वर्षीय महिला, तिच्या सोबत आलेल्या दोन मुली आणि पिंपरी चिंचवड शहरात राहणारा तिचा भाऊ आणि त्याच्या दोन्ही मुली असे एकूण 6 जणांच्या प्रयोगशाळा नमुन्यामध्ये ओमायक्रॉन विषाणू सापडल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने आज रविवारी (दि. 5) संध्याकाळी दिला आहे.

कोरोना सारखे आपल्याला कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या विषाणूवर यश मिळवायचे आहे. महानगरपालिकेच्या वतीने सापडलेल्या रुग्णावर योग्य उपचार चालू आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता मास्क वापरावे व स्वतःची काळजी घ्यावी असेही महापौर माई म्हणाल्या.

Share this: