क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

धक्कादायक :पिंपरीतील महिंद्रा स्पेसेस बांधकाम साईटवरून कामगारांचा पडून मृत्यू

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समोर असलेल्या महिंद्रा स्पेसेस या बांधकाम साईटवरून एका कामगारांचा पडून मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी  (दि.30) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सबंधित सर्व व्यक्तीवर निष्काळजी पणे मृत्यु घडविल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सतीश बंशीराम आडे ( वय-24, रा. चिखली) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगारांचे नाव आहे.

अजय बंशीराम आडे (वय – 24 , रा. चिखली) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पंकज गवारे (अंदाजे वय-38 वर्षे , रा . पिंपरी , पुणे ) नागेश , (अंदाजे वय -30 वर्षे , रा. पिंपरी ) जी . एम . सर्व्हसेस कंपनीचे सदर कामाशी संबंधीत सर्व व्यक्ती, महींद्रा लाईफ स्पेसेसचे सदर कामाशी संबंधीत सर्व व्यक्ती या आरोपींविरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ सतीश आडे महिंद्रा स्पेसेस या कनट्रक्शन साईटवरून ज्या ठिकाणी पाणी मारण्याचे काम करत होता त्या ठिकाणी तो काम करताना खाली पडुन त्याचा मृत्यु होणाची जाणिव असतांना सुध्दा तेथे सुरक्षाकरीता जाळी लावलेली नव्हती , जेथुन तो खाली पडला तेथील डक्ट ला सुरक्षा भिंत बांधण्यात आली नव्हती, त्याचप्रमाणे त्याला वैयक्तीक सुरक्षेकरीता हेल्मेट, सेफ्टी बेल्ट व इतर कोणत्याही प्रकारची सुरक्षा साधणे देण्यात आलेली नव्हती . तसेच फिर्यादी व इतर लोक काम करीत असलेल्या ठिकाणी देखील कोणत्याही प्रकारची सुरक्षाची सुविधा व साधने दिली नव्हती. त्यामुळे फिर्यादी यांचा भाऊ सतीश आडे  हा खाली पडला व गंभीर जखमी होवुन त्याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

Share this: