क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

ॲमेझाॅनमधील डीलीव्हरी बाॅयची करामत ;मागवला लॅपटॉप दिला मिठाचा पुडा

पिंपरी (वास्तव संघर्ष) : ॲानलाईन साईटवरून ॲाडर दिल्यानंतर अनेकांची फसवणूक झाल्याचा प्रकार सर्रास आपल्याला पाहायला मिळत आहे. असाच एक प्रकार ॲमेझाॅनमधील डीलीव्हरी बाॅयने केला आहे. ॲमेझाॅनवरुन एका ग्राहकांने ॲानलाईन लॅपटॉप मागवला होता मात्र त्यांना मिठाच्या पुड्या देण्यात आल्या आहेत. ही घटना 10 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास सुखवानी कॅम्पस वल्लभनगर पिंपरी येथे घडली आहे.

डॉ. जना प्रणितजोशी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार अज्ञात ॲमेझाॅकंपनीतील डीलीव्हरी बाॅयवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी जना यांच्या पतीने ऑर्डर केलेला 63, 990 रुपये किंमतीचा लेनोवो आयडीपॅड स्लीमकंपनीचा लॅपटॉप ॲमेझॉन इंडीया या कंपनीतून ऑनलाईन खरेदी केला होता. ॲमेझॉन कंपनीचे डिलिव्हरी एजंटने लॅपटॉप म्हणुन दिलेले पार्सल उघडून पाहिले असता त्यामध्ये लॅपटॉप ऐवजी दोन किलो मिठाच्या पुडया व खाकी कागद देवुन लॅपटॉपचा अपहार करुन फिर्यादी जना यांचे पती यांची अमेझॉनकंपनीतील अज्ञात व्यक्तीने फसवणुक केली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चाटे करित आहेत.

Share this: