बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर;दहावीत 242 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण

वास्तव संघर्ष आॅनलाईन :-महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. निकाल कधी लागणार याबाबत जवळपास 17 लाख विद्यार्थ्यांची उत्सुकता संपली आहे. राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के लागला आहे. मागच्या 15 वर्षांतील हा सर्वाधिक निकाल असल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या निकालात तब्बल 242 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. 242 पैकी 151 विद्यार्थी फक्त लातूर विभागातले आहेत.

कोकण विभागाचा निकाल जरी सर्वधिक असला तरी 100 टक्के गुण मिळवणारे 151 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत. यात नाशिक विभागातील एकही विद्यार्थी नसून फक्त 2 विद्यार्थी मुंबई विभागातील आहेत.

2017 साली 193 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले होते. तर 2018 साली 125 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले होते. तर गेल्यावर्षी केवळ 20 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले होते.

  • 8360 शाळांचा निकाल 100 टक्के

राज्यातील 22570 शाळांमधून 1754367 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी 8360 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. या निकालात तब्बल 242 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. तर एकूण 60 विषयांची परीक्षा घेण्यात आली, त्यामध्ये 20 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.

Share this: