क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

वाकडमध्ये हाॅटेल मालकाला बेदम मारहाण

वाकड (वास्तव संघर्ष) :पिंपरी चिंचवडमधील वाकड परिसरातील एका हाॅटेल मालकाला आणि त्यांच्या हॉटेलमधील कामगारांना लाथा-बुक्‍क्‍या तसेच काठीने मारहाण करण्यात आली आहे. ही घटना थेरगाव येथे शुक्रवारी (दि. 6) रात्री घडली. याप्रकरणी तिन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. धड

अकबरअली समशेरअली खान (वय 38, रा. डाव्हर कॉलनी, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आशपाक नुरा मुल्ला (वय 22), आरीफ अस्लम मुल्ला (वय 23, दोघेही रा. श्रीकृष्ण कॉलनी, काळेवाडी) आणि प्रतीक प्रभाकर बनसोडे (वय 23, रा. अण्णा भाऊ साठेनगर, वाकड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच त्याच्या सात साथीदारांच्या विरोधात (नाव, पत्ता माहिती नाही) वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींची थेरगाव परिसरात भांडणे सुरू होती. ती भांडणे फिर्यादी अकबरअली खान यांनी सोडविली. याचा राग आरोपींना आल्याने त्यांनी आपसांत संगनमत करून आपल्या इतर साथीदारांना बोलावून घेतले. शुक्रवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी व त्यांच्या हॉटेलमधील कामगारांना लाथा-बुक्‍क्‍या तसेच काठीने मारहाण केली. तसेच हॉटेलमधील साहित्याची तोडफोड करीत नुकसान केले. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Share this: