क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरीत लोखंडी रॉड डोक्यात घालून एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न

पिंपरी (वास्तव संघर्ष) :जुन्या भांडणाचा राग मनात धरून एकावर लोखंडी रॉड डोक्यात घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे . ही घटना घडली गुरुवारी सव्वासहाच्या सुमारास लक्ष्मी धर्मशाळेच्या बाजुला , डॉ वाघ यांच्या क्लिनीकच्या समोर , रिहर रोड , पिंपरी येथे घडली आहे. याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात चुलत भावाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खंडू बबन क्षिरसाठ ( वय-43 , रा . साईबध्दा गार्डन , फेज 2 , नढेनगर , काळेवाडी) असे हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गणेश मदन शिरसाठ (वय-36, रा. आंबेडकर कॉलनी , पिंपरी , पुणे )असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सव्वासहाच्या सुमारास लक्ष्मी धर्मशाळेच्या बाजुला , डॉ वाघ यांच्या क्लिनीकच्या समोर , रिहर रोड , पिंपरी येथे फिर्यादी खंडू शिरसाठ यांचा चुलत भाऊ आरोपी गणेश शिरसाठ याने जुन्या भांडण्याचा राग मनात धरुन त्याच्या हातातील लोखंडी रॉडने फिर्यादी खंडू शिरसाठ यांच्या डोक्यात मारुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे .याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे. अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

Share this: