अरे देवा! चक्क ‘या’ शेतकऱ्यांने मागितली गांजा लागवडीसाठी जिल्हाधिका-यांकडे परवानगी
सोलापूर (वास्तव संघर्ष) : गांजा हा अवैध व्यवसाय समजला जातो त्यामुळे कुणी गांजाचे नाव देखील काढले तरी त्याला पोलिसांचा खाकी लक्षात येते मात्र सोलापूर जिल्ह्य़ातील शिरापूर येथील एका शेतकऱ्याने स्वताच्या मालकीची जमीन गट नं .181/4 या क्षेत्रात त्यांची दोन एकर जमिनीवर चक्क गांजाची शेती करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे परवानगी मागितली आहे.
अनिल आबाजी पाटील (राहणार शिरापुर, ता. मोहळ जि. सोलापूर) असे शेतकऱ्यांचे नाव आहे.
सोलापूर जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात पाटील यांनी म्हटले आहे की, माझी सोलापूर शिरापूर मोहोळ येथे स्वताच्या मालकीची जमीन गट नं .181/4 असून या क्षेत्रात दोन एकर गांजा लावण्यासाठी प्रशासनाने परवानगी दयावी. मी शेतकरी असून कोणतेही पिक केले तरी त्याला शारानाचा हमी भाव नसल्यामुळे शेती तोट्यात करावी लागत आहे . शेतीमालाला कवीडमोल भाव मिळत असल्यामुळे शेती करणे कठीण झाले आहे . मशागतीसाठी केलेला खर्च देखील मिळत नाही .
तसेच एखाद्या साखर कारखान्याला ऊस गाळपासाठी दिला असता त्याचे देखील बिल लवकर मिळत नाही . त्यामुळे गांजाला चांगला भाव असल्यामुळे मला माझ्या वर नमुद गटामध्ये दोन एकर गांजा लागवड करण्याची दि .15 सप्टेंबर 2021 पर्यंत लेखी परवानगी दयावी अन्यथा मी दि . 16 सप्टेंबर 2021 या दिवशी आपल्या प्रशासनाकडून परवानगी मिळाली असे गृहित धरुन मी लागवड सुरु करणार आहे व माझ्यावर गुन्हा दाखल झाला तर त्यास आपले प्रशासन जबाबदार राहील असे देखील या निवेदनात म्हटले आहे.