क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी भाजपचे माजी सरचिटणीस सारंग कामतेकर यांच्यावर गुन्हा दाखल

भोसरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी चिंचवडमध्ये जशी जशी निवडणूक जवळ येत आहे तस तशी भाजपचे कारनामे दिसू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी स्थायी समिती सभापती नितीन लांडगे यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली होती. तसेच त्यानंतर भाजपच्या नगरसेविका आशा शेंडगे यांना आयुक्त राजेश पाटील यांच्या नामफलकावर शाई फेकल्यामुळे अटक करण्यात आली आहे, त्या सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. आता भाजपचे माजी सरचिटणीस सारंग कामतेकर यांच्या विरोधात भोसरी एमआयडीसी पोलिस स्टेशन मध्ये जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बालाजीनगर झोपडपट्टीत घडली आहे.

याबाबत महेंद्र लक्ष्मण सरवदे (वय-30 रा. बालाजीनगर झोपडपट्टी एमआयडीसी भोसरी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार सारंग कामतेकर (रा.भोसरी पिंपरी चिंचवड ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेंद्र सरवदे हे बालाजीनगर झोपडपट्टीत समाजसेवक म्हणून काम करत आहेत. या ठिकाणी आरोपी सारंग कामतेकर 2 जून रोजी दुपारी साडे अकराच्या सुमारास येऊन फिर्यादी महेंद्र सरवदे यांना म्हणाला की ” तु बालाजीनगर ला कोणताही राजकीय कार्यक्रम नको करू , जे काय असेल ते आम्ही करु तु केल्यास तुला संपवून टाकेन नाहीतर बाईच्या खोट्या केसमध्ये अडकवून टाकेन ” अशी जीवे मारण्याची धमकी दिली .अधिक तपास भोसरी एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जी एल चव्हाण करित आहेत

Share this: