बातम्या

महापालिका निवडणुकीत धोका पत्करू पण 50 टक्के नवीन तरुण-तरुणींना संधी – शरद पवार

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड शहरात संपुर्ण महाराष्ट्राच्या काना-कोप-यातून लोक आले आहेत. इथं प्रत्येक जिल्हा, तालुका निहाय त्यांच्या संघटना तयार झाल्या आहेत. माझ्या माहितीप्रमाणे 65 ते 70 टक्के इतकी बाहेरील लोकांची संख्या आहे. त्यामुळे आपण सर्वांनी गाववाले-बाहेरवाले असं न करता, प्रत्येकाला सामावून घेतलं पाहिजे. आता सगळे बाहेरचेच आहेत. चांगल काम करणा-यांना संधी दिली पाहिजे. गरीब-श्रीमंत घरचा बघू नका, लोकामध्ये मिसळून काम करणा-या आपण सर्वांनी ताकद दिली पाहिजे. या निवडणुकीत आपण धोका पत्करुन 50 टक्के नवीन तरुण-तरुणींना संधी द्यावी, असं प्रतिपादन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. 

यमुनानगर (निगडी) येथील बॅक्वेट हॉलमध्ये शनिवारी दि.16 राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नगरसेवकांची बैठक पार पडली. यावेळी शरद पवार हे मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी खासदार डाॅ. अमोल कोल्हे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, आमदार आण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापाैर आझम पानसरे आदी शहर पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.       

पवार म्हणाले की, पिंपरी – चिंचवड शहराची निम्या भागाची मालकी एकाकडे, दुस-या भागाची मालकी एकाकडे, अशी शहराची वाटणी केली आहे. शहरात विकासाचे कोणतंही धोरणात्मक काम दिसत नाही. केवळ विकास कामाच्या नावावर त्या दोघांचे वेगळेच उद्योग सुरु आहेत. हे सगळे दुरुस्त करायला हवं, ते तुम्हीच करु शकता. महापालिका निवडणुकीत पाच वर्ष कारभार कसा सुरु आहे. तो पुढील चार महिने लोकासमोर मांडा. त्यांचा सगळा भ्रष्टाचार जनतेसमोर आणून ठेवा, लोकांमध्ये भाजपविषयी असंतोष असून तो निवडणुकीतून नक्की बाहेर येईल.

महापालिका निवडणुकीसाठी तीन प्रभाग रचना झालेली आहे. त्यानूसार आपल्याला काम करावे लागणार आहे. पण पाठीमागे भाजपच्या लोकांना प्रभाग रचना करताना प्रचंड तोडफोड केली. त्याचा फटका आपल्याला बसला. ते सर्व दुरुस्त करावं लागणार आहे. त्याबाबत आपण काळजी करायची गरज नाही. ते सर्व पालकमंत्री बघून घेतील. आपण सर्वांनी लोकांमध्ये जावून पक्षाचे विचार, त्यांची कामे करा. महिलांचा जागा 50 टक्के असणार आहे. तुम्हा सर्वांना संधी मिळेल, पण निवडून येणं गरजेचे आहे. लोकांमध्ये मिसळून काम करा. सर्वसामान्य जनतेला आपलंस करा. त्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून द्या. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50 टक्के जागांची संधी माझ्या काळात दिली. त्यानूसार संपुर्ण देशात हा कायदा लागू झाल्याचे मला समाधान आहे. असंही पवार म्हणाले.

Share this: