क्राईम बातम्याबातम्यामहाराष्ट्र

वर्गणीच्या नावावर खंडणी मागणा-या कार्यकर्त्यानां पोलिसांनी केली अटक..!

वास्तव संघर्ष न्यूज-
वर्गणीची खोटी पावती बनवत देहुरोड येथील व्यापा-याला खंडणी मागितल्याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना शनिवारी तळवडे येथे घडली.
विपीन रामकला अगरवाल (वय२९.रा.संजय टायटेनियम पार्क स्ट्रीट काळेवाडी फाटा) यांनी याप्रकरणी देहुरोड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.त्यानुसार पंचकुला कचरू गायकवाड (रा.संजयगांधीनगर पिंपरी ) दिनकर ओव्हाळ,मिलिंद आनंद शादुल ,विजय आनंद मोरे.(तिघे रा.नढेनगर काळेवाडी ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वर्गणीच्या नावावर खंडणी मागणा-या टोळी शहरात फिरत आहेत.या टोळ्या समाजसेवकाचा बुरखा घालून दिवसाढवल्या गुन्हा करत असल्याने अशांना पोलिसांनी वेळीच ठेचने गरजेचे आहे.पिंपरी-चिंचवड मधील पोलिस आयुक्तांनी याकडे लक्ष द्यावे हीच सर्वसामान्य जनतेची मागणी आहे.
दरम्यान तक्रारदार विपीन हे तळवडे येथे व्यापार करतात त्याच्याशी दमदाटी करत आरोपीनी पाच हजार शंभर रूपयांची खंडणी मागितली.विपीन यांनी प्रथम ती मारायच्या भितीने खंडणी दिली.त्यानंतर आरोपीनी रश्मी फँब्रीकेटर्स या कंपनीच्या मालकाला सात हजार पाचशे रूपयांची खंडणी मागितली असे तक्रारदार विपीन यांनी देहुरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
Share this: