पिंपरीतील खराळवाडीत रेन ट्री झाडांची चोरी ;चार ते पाच चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल
पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरीतील खराळवाडीत रेन ट्री झाडांची चोरी करण्यात आली आहे. ही घटना रविवारी (दि. 10 ते 17) रोजी सकाळी दहाच्या सुमारास प्रकाश डेकोरेटर गणेश मंदिराच्या पाठीमागे खराळवाडी येथे घडली आहे.चार ते पाच आरोपीवर महाराष्ट्र (नागरी क्षेत्र ) झाडांचे संरक्षण व जतन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदिप पांडुरंग गायकवाड यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार चार ते पाच अज्ञात चोरट्याविरूध्द पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी दहाच्या सुमारास प्रकाश डेकोरेटर गणेश मंदिराच्या पाठीमागे खराळवाडी येथे टेम्पो क्र . एम . एच 11 ए एल 877 व दुसरा टेम्पो क्रं . ( नंबर माहीत नाही ) या वरील चार ते पाच चोरटे यांनी दोन रेन ट्री जातीचे मध्येवढी 262 ते 254 से.मी. वय अंदाजे 25 ते 30 वर्षे असलेल्या झाडांची पुर्ण जमीन समांतर तोड करुन वन विभागाची कोणतीही परवानगी न घेता फिर्यादी यांच्या संमतीशिवाय , अप्रमाणिक उद्देशाने स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी झाडांची चोरी केली आहे. आरोपीवर महाराष्ट्र (नागरी क्षेत्र ) झाडांचे संरक्षण व जतन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पिंपरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कोकाटे करित आहेत.