क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

अविवाहित असल्याचे खोटे सांगून तरुणीवर अत्याचार

चाकण(वास्तव संघर्ष ): फेसबुकवरून मैत्री झालेल्या मित्राने स्वतः अविवाहित असल्याचे खोटे सांगून तरुणीवर अत्याचार केला आहे . तरूणीसोबत लग्न करण्याची वेळ आल्यानंतर आरोपी तरुण काहीएक न सांगता निघून गेला. तरुणीने आरोपीच्या घरी जाऊन चौकशी केली असता त्याच्या घरच्यांनी तरुणीला जातीवाचक शिवीगाळ केली. हा प्रकार मार्च 2020 ते 31 ऑक्टोबर 2021 या कालावधीत चाकण येथे घडला.

पीडित तरुणीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

विजय अशोक कांडगे (रा. आंबेठाण चौक, चाकण), अशोक कांगडे आणि तीन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित तरुणीसोबत फेसबुकद्वारे मैत्री केली. त्याने तो अविवाहित असल्याचे खोटे सांगून तिला लग्नाचे आमिष दाखवले. लग्नाचे आमिष दाखवून ऑगस्ट 2020 मध्ये आरोपीने पीडित तरुणीला चाकण येथे नेऊन तरुणी सोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. ऑक्टोबर 2020 मध्ये देहूगाव तसेच फेब्रुवारी 2019 मध्ये रिसॉर्टवर घेऊन जात आरोपीने फिर्यादी सोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.फिर्यादी सोबत लग्न करण्याची वेळ आली असता 18 जुलै 2019 पासून आरोपी फिर्यादी तरुणीला काहीही न सांगता निघून गेला. तो परत न आल्याने त्याची चौकशी करण्यासाठी तरुणी आरोपीच्या घरी गेली. तरुणीचे काहीही ऐकून न घेता त्याच्या घरच्यांनी तिला मारहाण केली. तसेच जातीवाचक शिवीगाळ केली. अधिक तपास सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे  करीत आहेत.

Share this: