बातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी चिंचवड पालिकेच्या निवडणुका पुढे जाण्याची शक्यता – आयुक्त राजेश पाटील

पिंपरी(वास्तव संघर्ष) :आगामी पिंपरी चिंचवड पालिकेच्या  निवडणुका पुढे जाण्याची शक्यता आयुक्त राजेश पाटील यांनी वर्तवली . आगामी महानगरपालिका निवडणूकीसाठी भारत निवडणूक आयोगाच्या वतीने विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 1 नोव्हेंबर 2021 ते 30 नोव्हेंबर 2021 दरम्यान घेण्यात येणार असून त्यामध्ये मतदार नोंदणी करता येणार असल्याची माहिती पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी पञकारांनी प्रभाग रचनेला होत असलेली दिरंगाई या संबंधी निवडणूक आयोगाचे कोणतेही आदेश नसणे तसेच 2017 च्या निवडणुकीचा संदर्भ घेता एकंदर निवडणूक प्रक्रियेला सहा महिने लागू शकतात याबाबत विचारले असता आयुक्त पाटील यांनी आगामी निवडणुका पुढे जाण्याची शक्यता आहे असा अंदाज वर्तवला.

पुढे बोलताना आयुक्त म्हणाले, ज्या व्यक्तीचे वय 1 जानेवारी 2022 रोजी 18 किंवा अधिक असेल त्यांना 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर2021 पर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे.  पुनरीक्षण कार्यक्रमा अंतर्गत नागरिकांना मतदार नोंदणी ऑनलाईन पध्दतीने ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर करता येणार आहे.महत्वाचं म्हणजे, या कार्यक्रमांतर्गत 1 जानेवारीी 2022 रोजी 18 किवा अधिक वय असलेले नागरिक मतदार यादीत आपलं नाव नोंदवू शकतील.  विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची अधिक माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर पाहता येईल.


ब-याच मतदारांना अस वाटत की, आपल्याकडे मतदार ओळखपत्र आहे म्हणजे आपण मतदान करु शकतो. पण तसं नाही, मतदान करण्यासाठी यादीत नाव असणं अत्यंत आवश्यक आहे.  तेव्हा सर्व मतदारांनी मतदार यादी पाहावी, तपशिलात बदल असतील तर संबंधित अर्ज भरावेत आणि 18 वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांनी नाव नोंदणी करावी, या दृष्टीने आकाशदिवा आणि रांगोळी यांच्या माध्यमातून आपल्याला यंदाची दिवाळी लोकशाहीमय करायची आहे.असे देखील आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.

Share this: