अवैधरित्या गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी चिखली पोलिसांनी केली दोघांना अटक
चिखली (वास्तव संघर्ष) : अवैधरित्या गावठी पिस्तूल व काडतूस बाळगल्याप्रकरणी चिखली पोलिसांनी दोघांना अटक केली आहे . ही घटना मोरेवस्तीतील ओमसाई इमारत येथे शनिवारी ( दि . 30 ) दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे. चिखली पोलिसांनी ही कारवाई केली .
पोलीस हवालदार सुनील शिंदे यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
मोहम्मद मोनिश इसरार अहमद शेख ( वय 25 , रा . साईनगर , देहूरोड , मूळ रा . नवी दिल्ली ) आणि फरमान इसुब अनसारी ( वय 24 , रा . मोरेवस्ती , चिखली ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , कोणाच्या तरी जिविताला धोका पोहचविण्यासाठी आरोपींनी शस्त्र बाळगल्याची माहिती मिळाली . त्यानुसार चिखली पोलिसांनी कारवाई केली . आरोपींकडे 25 हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे एक पिस्तूल व 100 रुपये किमतीचे एक काडतूस मिळून आले . अधिक तपास चिखली पोलीस करीत आहेत .