क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

रेल्वेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने 26 लाखांचा गंडा

देहूरोड (वास्तव संघर्ष :रेल्वे विभागात नोकरी लावण्याच्या बहाण्याने एकाने सहा जणांना 26 लाखांचा गंडा घातला. तसेच भारतीय रेल्वेच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून सहा जणांची आणि शासनाची फसवणूक केली. हा प्रकार 28 जानेवारी 2020 रे 14 जानेवारी 2021 या कालावधीत देहूरोड येथे घडला.

याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने  देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे

राहुल धौलपुरीया असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला तसेच सुरेश हनुमंत राव, सचिन प्रकाश तुळे, वैभव तुकाराम भिगवणकर आणि एका महिलेकडून आरोपीने प्रत्येकी पावणे पाच लाख रुपये घेतले. तसेच फिर्यादी यांचे वडील हनुमंता दोडप्पा राव यांच्याकडून हातउसने म्हणून वेळोवेळी दोन लाख 25 हजार रुपये घेतले. सहा जणांकडून आरोपीने तब्बल 26 लाख रुपये घेतले. त्यांना रेल्वे विभागात नोकरी न लावता भारतीय रेल्वेच्या नावाने बनावट कागदपत्रांचा उपयोग करून फिर्यादी आणि शासनाची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.अधिक तपास देहूरोड पोलीस  करीत आहेत

Share this: