पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या उपस्थितीत गंगा आरती छटपुजा महोत्सवाचा समारोप
पिंपरी (वास्तव संघर्ष ) : मोशी येथिल इंद्रायणी घाटावर छटपुजानिमित्त पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी गंगा महाआरतीस उपस्थित राहून नदीपूजन केले. उत्तर भारतीय कुटूंबियांच्या छटपुजा महोत्सवाचा समारोप गुरुवारी (दि. 11) संपन्न झाला. विश्व श्रीराम सेनेच्या वतीने या महोत्सवात यावेळी कोरोनाचे सर्व नियम पाळून धार्मिक विधी करण्यात आले.
विश्व श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष लालबाबू गुप्ता यांनी उपस्थितांचे स्वागत केले. काशी बनारस येथून आलेल्या पौरोहित्यांनी महागंगा आरती केली. छटपूजा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमोद गुप्ता, अकरम शेख, श्यामबाबू गुप्ता, विनोद प्रसाद, इम्तियाज शेख, बच्चाबू गुप्ता, मुन्ना प्रसाद, रोहित प्रसाद, रामसमुज यादव, पंकज पांडे, पृथ्वीराज प्रसाद, संजय गुप्ता, पप्पू गुप्ता यांनी परिश्रम