बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

दापोडीतील एसआरए प्रकल्प कायमस्वरुपी रद्द करा; एल्गार महामोर्चातील नागरिकांची मागणी

पिंपरी (वास्तव संघर्ष ): दापोडीतील एसआरए प्रकल्प कायमस्वरुपी रद्द करा अशी मागणी सर्वे नं. 68,69,71,72,73,74 जयभीम नगर, गुलाब नगर, सिध्दार्थ नगर, लिंबोरे वस्ती, महात्मा फुले नगर येथिल रहिवासी नागरीकांची पहिल्यापासून आहे. तरी देखिल पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन नागरीकांना विश्वासात न घेता नागरिकांच्या डोळ्यात धुळफेक करुन हा प्रकल्प करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करीत आहे. प्रशासनाने हा प्रकल्प कायमस्वरुपी रद्द न केल्यास कृती समितीच्या वतीने उभारण्यात आलेला हा लढा आणखी तीव्र करु असा निर्वाणीचा इशारा दापोडी एसआरए विरोधी संयुक्त कृती समितीचे समन्वयक आणि रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे यांनी दिला.

दापोडी एसआरए विरोधी संयुक्त कृती समितीच्या वतीने सोमवारी (दि. 15 नोव्हेंबर) दापोडी येथून पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकातपर्यंत मोर्चा काढण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. सभेनंतर प्रतिनिधी मंडळाने महापौर माई ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके आणि आयुक्त राजीव जाधव यांना निवेदन दिले.

या मोर्चात माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, रमा ओव्हाळ, मारुती भापकर, सनी ओव्हाळ, रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे, गोपाळ मोरे, विनय शिंदे, अजय पाटील, तुषार नवले, प्रितम कांबळे, सुधिर जम, सुवर्णा डंबाळे, सिकंदर सुर्यवंशी, रविंद्र कांबळे, अकील शेख, सुप्रिया साळवी, दिपक साळवे, प्रमोद गायकवाड, वामन कांबळे, मनोज उप्पार, कमलेश पिल्ले, श्रीमंत शिंदे, नवनाथ डांगे, रेश्मा मोरे आदी सहभागी झाले होते.

Share this: