क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पतीपत्नी विरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

चिखली (वास्तव संघर्ष) : ‘मांग्याची गाडी कोणी आतमध्ये घेतली असे जातीवाचक बोलून तसेच  दोघा पतीपत्नीने शिवीगाळ केली.  प्रथमेश पार्क सोसायटी  कुदळवाडी चिखली येथे शनिवारी (दि.06) रोजी रात्री पावणेआठच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी विरुद्ध अनुसुचित जाति जमाती व अत्याचार प्रतिबंधक (ॲस्टोसिटी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पिडीत तरुणाने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कुंडलीक धोंडीबा मोरे(वय 65), सरिता मोरे-तुपे (वय 32 दोघे रा. प्रथमेश पार्क सोसायटी प्लॅट नंबर 201 कुदळवाडी चिखली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास यातील फिर्यादी यांनी आरोपी कुंडलीक मोरे याच्याकडून प्रथमेश पार्क सोसायटी चिखलीमध्ये  फ्लॅट खरेदी केला होता. व त्या फलॅटचे कागदपत्र घेवुन फिर्यादी  सोसायटी मध्ये गेले. फिर्यादी हे आपले मित्र मलखान सिंग, वेदांत पुजारी, आशिष कांबळे, महेश कदम, गोपाळ कच्छवे यांच्याशी सोसायटीच्या पार्किंगमध्ये थांबले असताना आरोपी कुंडलीक मोरे आणि त्याची पत्नी सरिता मोरे – तुपे त्यावेळी यातील आरोपी कुंडलीक मोरे याने  फिर्यादीस पाहून ‘या मांग्याची गाडी कोणी आतमध्ये घेतली असे जातीवाचक बोलून तसेच दोघा पतीपत्नीने शिवीगाळ केली.

ए मांग्या , ए मांग्या , ए मांग्या , ए कसब्या , मादरचोद , दलिंदर तुझी लायकी आहे का ? तुझी हिमंत कशी झाली इथे यायची असे जातीवाचक शिवीगाळ करुन फिर्यादी यांचा अपमान केला आहे. आरोपी सरिता मोरे तुपेवर गंभीर गुन्हा दाखल असून आरोपी कुंडलीक मोरे आरोपी सरिता मोरे हे या परिसरात दादागिरी करत असल्याचे स्थानिक सांगत आहेत. सदर आरोपी गुन्हा दाखल होताच फरार झाले आहेत. अधिक तपास सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईकपाटील करित आहेत.

Share this: