क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

चिखलीतील भंगाराच्या गोडाऊनला आग ;आगीत सामान जळून खाक

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड शहरातील चिखली – आळंदी रोडवर येथे भंगार गोडाऊनला लागलेल्या आगीत गोडाऊनमधील सर्व साहित्य जळून खाक झाले . त्यामध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल साहित्य होते . ही घटना आज , रविवारी ( दि . 22 ) सकाळी घडली

मिळालेल्या माहितीनुसार , चिखली – आळंदी रोडवर चिखली येथे भंगारचे गोडाऊन आहे . त्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल साहित्य ठेवण्यात आले आहे . रविवारी सकाळी अचानक गोडाऊनला आग लागली . यामध्ये गोडाऊन मध्ये ठेवलेले सर्व साहित्य जाळून खाक झाले .

रविवारी सकाळी दहाच्या सुमारास हि घटना उघडकीस आल्यानंतर अग्निशमन विभागाला घटनेची माहिती देण्यात आली पिंपरी – चिंचवड अग्निशमन विभागाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले . जवानांनी तत्काळ आगीवर नियंत्रण मिळविले आहे . या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही .

Share this: