कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करून तरुणाला लुटले
पिंपरी (वास्तव संघर्ष ): रस्त्याने पायी चालत जात असताना त्यावेळी दुचाकीवरून आरोपी आले. त्यांनी फिर्यादी यांना कोयत्याचा धाक दाखवून हाताने व दगडाने मारहाण केली.
हा प्रकार एमआयडीसी भोसरी येथे सोमवारी (दि. 22 ) रात्री सव्वाअकरा वाजता क क्षेत्रीय कार्यालयासमोर घडला.
प्रदीप कुमार सुरेश प्रसाद सिंग (वय 30 , रा. खराळवाडी, पिंपरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
रोहन राणुजी शिंदे (वय-22), विजय राजू तांगडे (वय 18 , दोघे रा. नेहरूनगर, पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांचा 10 हजारांचा मोबाईल फोन आणि 1200 रुपये रोख रक्कम असा एकूण 11 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने चोरून नेला. आरोपींनापोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास एमआयडीसी भोसरी करीत आहेत.