आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘रिव्हर सायक्लोथॉन’
पिंपरी(वास्तव संघर्ष ): पर्यावरण संवर्धन आणि इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाची जनजागृती करण्यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये भारतातील सर्वात मोठी ‘रिव्हर सायक्लोथॉन’ आयोजित केली आहे. भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. रविवारी (दि. 28 नोव्हेंबर) सकाळी 6 वाजता, भोसरीतील गावजत्रा मैदानावर रिव्हर सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी आमदार महेश लांडगे, माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, स्थायी समिती अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे, माजी अध्यक्ष संतोष लोंढे, अविरत श्रमदान व सायकल मित्रचे संस्थापक सदस्य डॉ. निलेश लांढे, संतोष गाढवे आदी उपस्थित होते.
पर्यावरण संवर्धनासाठी काम करणारी अविरत श्रमदान, सायकल मित्र, महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन, पर्यावरण प्रेमी संस्था आणि पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाच्या पुढाकाराने प्रत्येक वर्षी रिव्हर सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात येते.रिव्हर सायक्लोथॉन तीन टप्पयात होणार आहे. लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी 7 किमी मार्यादा आहे. कै. अंकुशराव लांडगे सभागृह- जय गणेश साम्राज्य – संतनगर – कै. अंकुशराव लांडगे सभागृह असा मार्ग असेल. दुसरा टप्पा 15 किमी अंतराचा असून, कै. अंकुशराव लांडगे सभागृह – जय गणेश साम्राज्य क्रांती चौक – जय गणेश साम्राज्य – कै. अंकुशराव लांडगे सभागृह असा राहणार आहे. तसेच 25 किमी अंतराच्या सायक्लोथॉन साठी कै. अंकुशराव लांडगे सभागृह – स्पाईन रोड – क्रांती चौक साने चौक, कृष्णानगर – कै. अंकुशराव लांडगे सभागृह असा राहणार आहे. सहभागी होणाऱ्या प्रत्येक सायकलपटूला टी-शर्ट, हॅवर सॅक, वॉटर बॉटल आणि मेडल मोफत देण्यात येणार आहेत.
इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानाची जनजागृती करण्यासाठी आयोजित केलेल्या या सायक्लोथॉनमध्ये पिंपरी चिंचवडमधील नागरिकांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सहभागी होण्यासाठी गणेश पानसरे (968991535), बापु शिंदे (9552187778) यांच्याशी संपर्क साधवा. तसेच, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी https://forms.gle/AHimsjLqwscNoyhF6 या लिंकला भेट द्यावी, असेही आवाहन अविरत श्रमदानचे संस्थापक सदस्य दिगंबर जोशी यांनी केले आहे.