धक्कादायक :पिंपरी चिंचवडच्या लाॅजमध्ये नग्नावस्थेत आढळला तरुण तरुणीचा मृतदेह
पिंपरी(वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवडच्या दिघीमधील मॅगझीन चौकात असलेल्या अथर्व लाॅजमध्ये नग्नावस्थेत तरुण तरुणीचा मृतदेह आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 25) रोजी सकाळी अकराच्या सुमारास घडली आहे.
प्रकाश ठोसर (वय – 28) आणि वैशाली (वय – 30 दोघे रा. अजंठानगर झोपडपट्टी)असे मृत झालेल्या दोघांचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांपासून मयत प्रकाश ठोसर आणि 30 वर्षीय विवाहित तरुणीचे प्रेमसंबंध होते. ते दोघे दिघी परिसरातील मॅगझीन चौकात असलेल्या अथर्व लॉजमध्ये नेहमी भेटायचे. हे दोघे अनेकदा रात्री मुक्कामी यायचे आणि सकाळी निघून जायचे. मयत प्रकाश ठोसर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. तर मयत तरुणीचा पती हा देखील एका गुन्ह्यात येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. काल रात्री हे दोघे लॉजवर आले होते. त्यानंतर आज सकाळी चेक आऊट कऱण्याचा वेळ झाला तरी या दोघांनी रूमचा दरवाजा उघडला नसल्याने तेथील कामगाराने दरवाजा ठोठावला. मात्र, बऱ्याच वेळानंतर देखील ते दरवाजा उघडत नसल्याने पोलिसांनी लॉजवर येऊन दरवाजा तोडून रुममध्ये प्रवेश केला तेव्हा प्रकाशचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता. तर खाली जमीनीवर 30 वर्षीय तरूणीचा मृतदेह नग्नावस्थेत आढळून आला.अधिक तपास दिघी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिंदे करित आहेत.