बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

आयुक्त साहेब..! पिंपरी चिंचवडकरांच्या मनातून आमदार महेश लांडगेंना कसे काढाल?

पिंपरी(वास्तव संघर्ष) : पिंपरी-चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या समर्थकांनी वाढदिवसाचे निमित्त साधून संपूर्ण शहरात तुफान बॅनरबाजी केली आहे. मात्र, महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना शहरातील आमदार महेश लांडगे यांचे फ्लेक्स काढून टाका, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

महापालिका आगामी निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर आली आहे. सत्ताधारी भाजपाचे शहराध्यक्ष म्हणून आमदार लांडगे यांच्या समर्थकांनी भोसरीसह संपूर्ण शहरात ठिकठिकाणी विविध समाजपयोगी कार्यक्रम, मनोरंजनाचे कार्यक्रम आणि उपक्रमांची ‘धडाका’ लावला आहे. निवडणुका तोंडावर आल्या असल्यामुळे भाजपाने जोरदार वातावरण निर्मिती केली आहे. गेल्या 15 दिवसांपासून कार्यक्रमाची रेलचेल आणि फ्लेक्सचा धुरळा उडाला आहे.

दरम्यान, लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाचे वातावरण होवू लागल्यामुळे अस्वस्थ झालेल्या राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी ही बाब मुंबईपर्यंत पोहोचवल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुंबईतून राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना ‘‘विशेष सूचना’’ दिल्या आहेत. त्यानुसार लांडगे समर्थक आणि भाजपा कार्यकर्त्यांच्या ‘बॅनरबाजी’चा आता ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्याची भूमिका महापालिका आयुक्तांनी घेतली आहे.

महापालिका आयुक्त महाविकास आघाडीची ‘कठपुतली’?


पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्ता राजेश पाटील महाविकास आघाडीची कटपुतली असल्यासारेख वागत आहेत. भाजपाचे वातावरण निर्माण झाल्यावर प्रशासकीय अडचणी निर्माण करुन भाजपा नेते आणि नगरसेवकांना अडचणीत आणण्याची भूमिका घेतली जात आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्या दौऱ्यात महापालिकेचा एकही अधिकारी उपस्थित राहिला नाही. राजशिष्ठाचार पाळला नाही. वास्तविक, भाजपाला कोणत्याही उपक्रमाचे, कार्यक्रमाचे ‘क्रेडिट’ मिळू नये. याकरिता आयुक्त महाविकास आघाडीच्या इशाऱ्यावर काम करीत आहेत का? असा सवाल भाजपा कार्यकर्त्यांमधून उपस्थित केला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घाबरली?
आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त झालेले बँडिंग आणि भोसरीसह पिंपरी-चिंचवडमधील कार्यक्रमांना मिळणारा प्रतिसाद पाहून शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे आमदार लांडगे यांचे फ्लेक्स काढण्याचे नियोजन केले प्रशासनाला हाताशी धरुन केले आहे. दुसरीकडे, भारतीय जनता पार्टीच्या समर्थकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आगामी काळात महापालिका राष्ट्रवादी विरुद्धा भाजपा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

Share this: